Activity Work Book for XII New syllabus (With Marathi Translation) is available for sale. Do buy it as early as possible. Price Rs. 400 + 50 (Packing and Postage charges)= Rs.450 < Contact Writer:- Prof. Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon Dist.Jalgaon. Whats app Number: 9850737199 , Cell 9850737199


Information of CET: Admission- Std. XI


Information of CET to take Admission to Std. XI

 

       राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा घेता त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र दहावी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहावी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिना अखेर किंवा ऑगस्टचा पहिल्या आठवडयात आयोजित केली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागानं या सीईटी संदर्भात एक शासन निर्णय जारी केला आहे. अकरावी प्रवेशासाठी ची सीईटी परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. सीईटी परीक्षा ही दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

सदर परीक्षेचे प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषय असतील

१) इंग्रजी

२) विज्ञान

३) गणित

४) सामाजिक शास्त्र

वरील विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (objective MCQ) स्वरूपाचे असतील. परीक्षा ही ओएमआर (OMR) पद्धतीने घेतली जाईल.

सीईटी परीक्षा 100 गुणांची असेल आणि त्यासाठी एकच प्रश्न पत्रिका असेल. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.

सामाईक प्रवेश परीक्षा ही शिक्षण आयुक्त यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल.

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ही पूर्णतः ऐच्छिक असल्याने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळ परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठीचा पर्याय उपलब्ध करून देईल. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. शिवाय सीबीएस आयसीएस इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना या सीईटी परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून परीक्षा परिषदेकडून शुल्क घेण्यात येईल.

शासन आदेश:

Download the GR from the following link:

 G.R. of CET(Download)

 

Post a Comment

2 Comments

Unknown said…
rahulpandhare4966@gamil.com
Anonymous said…
Sir 12 board exam nahi honar ka