दहावी इंग्रजी ची तयारी कशी करावी?
लेखन: श्री. साहेबराव महाजन सर
एम.एस.पी.विद्यालय
जांभूळ ता. कल्याण
--------------------------------------------------------
विद्यार्थी मित्रांनो,
परीक्षेला फक्त काही दिवस बाकी असतांना रिव्हिजन व स्व:अध्ययन
करण्यासाठी पाठ्यपुस्तक महत्त्वाचे आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या कृतीपत्रिकेमध्ये
कोणत्या कृती (Activities) विचारल्या
जातील त्यांची उत्तरे कशा प्रकारे अपेक्षित आहेत मार्गदर्शन पाठ्यपुस्तकामध्ये
आहे. त्यामुळे बारकाईने पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणे हे तुमच्यासाठी फायद्याच आहे.
१. वाचन करा:
तुम्ही Seen व Unseen
Passages वाचण्यात, आशय समजून
घेण्यात व उत्तरे शोधण्यात फार वेळ वाया घालवता आणि शेवटी वेळे अभावी writing
skills मधील एखादी activity किंवा भाषांतर
सोडून देता.
Seen Passages चे आकलन सुलभ व जलद
होण्यासाठी दररोज 1 गद्य व 1 पद्य
मोठ्याने वाचा व पान क्र. 73 वर दिलेल्या skimming
व scanning
technique चा वापर करा.
२. सराव करा :
वाचन केलेल्या प्रत्येक परिच्छेद नंतर what,
when, where, who, how, why प्रश्नांची उत्तरे तयार करा.
एखाद्या महत्त्वाच्या घटकाबद्दल सविस्तर माहिती असल्यास
ती 4 points मध्ये नोंदवा.
त्यामुळे Q2, Q3 व Q4 मधील A1,
A2 च्या simple factual व B1,
B2 च्या complex factual या activities
च्या 16 गुणांची
तयारी होते.
Dialogue Writing व Drafting
a Speech साठी Warming Up activities चा सराव करा.
Writing Skills साठी English
Workshop मध्ये दिलेल्या सर्व activities सराव करा.
३. पाठांतर करा:
Q.3 B) Poetic Appreciation मधील theme
पाठांतरावर आधारित
आहेत. कवितांच्या आशयावरून themes पाठ करा.
गद्य व पद्य पाठातील समास (Margins) मधील शब्द व phrases
चे अर्थ पाठ
करा.
त्यामुळे शब्दार्थावर आधारित 4 गुणांच्या activities
तयारी होते.
४. लेखन करा:
A) Formats:
उत्तरपत्रिकेत तुम्हाला काही activities ची उत्तरे
विशिष्ठ Formats मध्ये लिहायची आहेत.
उदा. पाठ्यपुस्तकातील पान क्र. 15 वर Drafting
a News,
पान क्र. 171 वरील Letter writing (Formal) व
पान क्र. 5 वर Poetic
Appreciation.
यांचे formats पहा. ते formats
वहीमध्ये लिहा
व त्यांचा सराव करा.
कवितेचे रसग्रहण (Poetic
Appreciation) साठी सुरवातीच्या
फक्त 5 Points चा विचार करून त्या मध्ये उत्तर लिहा.
B) Writing Skills:
या घटकाच्या पूर्वतयारीसाठी इंटरनेटच्या सहाय्याने
प्रत्येकी 25 या प्रमाणे सुविचार, म्हणी, वाक्प्रचार, तुलनात्मक व
अलंकारित expressions वहीत लिहा.
‘Let's March’ ह्या पाठात
खूप छान appealing वाक्य आहेत त्यांचा वापर Personal
Response Questions, drafting a speech व developing
a story या activities साठी करा.
--------------------------------------------------------
प्ररीक्षेच्या पूर्व तयारीसाठी संदर्भ चित्र-
--------------------------------------------------------
See more resources-
3) News writing
--------------------------------------------------------
See more-
1) Format of Std. X Board Activity Sheet
2) Practice Question Papers - Std. X
5) Use- If ------ not or Unless
6) Grammar Quiz
--------------------------------------------------------
0 Comments