CET for Std. 11th
Admission
Maharashtra Std. 11 Admissions
2021 Common Entrance Test is likely to be conducted in August first week. This
exam will be conducted for students of all Boards (State Boards, CBSE, CISCE,
All International Boards, etc.)
महाराष्ट्र इयत्ता 11 प्रवेश 2021 कॉमन
एन्ट्रन्स टेस्ट 21 ऑगस्टला होईल. ही परीक्षा सर्व
बोर्ड (राज्य बोर्ड, सीबीएसई, सीआयएससीई, सर्व आंतरराष्ट्रीय बोर्ड इ.) च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल.
Features of the exam:
परीक्षेची वैशिष्ट्ये:
1) Exam will be an
objective type of paper.
परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रकारचा पेपर असेल.
2) The question paper
will be based on Std. 10 syllabus.
प्रश्नपत्रिका इयत्ता १० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
3) The question paper
will have questions of 25 marks each on English, Mathematics, Science and
Social Sciences.
प्रश्नपत्रिकेत इंग्रजी,
गणित,
विज्ञान आणि सामाजिक विज्ञान यावर
प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील.
4)
उत्तरे लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना ओ.एम.आर. पत्रक देण्यात येईल.
5) The exam will be
taken offline.
परीक्षा ऑफलाइन घेण्यात येईल.
6) Time for the exam will
be of two hours.
परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
7) The CET is only an
optional exam for the Std. 11 admissions. Students who wish to
appear for it, would get admissions in Std.11 based on the merit score in CET.
While those who choose not to appear for it, will get admissions based on the
merit of their Std.11 (SSC) results.
सीईटी ही ऐच्छिक परीक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांना या
परीक्षेस बसण्याची इच्छा आहे त्यांना सीईटीमधील गुणवत्तेच्या आधारे इयत्ता ११ वीत प्रवेश
मिळेल. जे प्रवेश परीक्षा देणार नाहीत त्यांना त्यांच्या इयत्ता दहावी च्या
(एसएससी) निकालाच्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळतील. मात्र उपलब्ध जागा असतील
तरच प्रवेश मिळेल.
8) State Board
students who had already paid the examination fees for Std. 10 board exams will
not have to pay the fee for this exam. Students of other boards have to pay the
fee for the exam.
एस.एस.सी. बोर्ड विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेचे शुल्क
भरले होते. म्हणून या परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना फी भरावी लागणार नाही. इतर
मंडळांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी फी भरावी लागेल.
9) In the first phase
of Std. 11 admissions, the students who have appeared for CET will get
admissions on the basis of their merit score in it. After the admissions of
such students, the remaining vacancies in Std. 11 will be open to the students
who have not appeared for the CET.
इयत्ता अकरावी च्या पहिल्या टप्प्यात सीईटी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना
त्यांच्या गुणांच्या आधारे प्रवेश मिळेल. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर उर्वरित
रिक्त जागा अकरावी सीईटीमध्ये जे विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यासाठी
खुल्या असतील.
10) From Monday, 26 July, the
process of registration will start.
सोमवार, २६ जुलै पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.
11) Exam date: 21 August 2021
(Saturday)
Time: 11 a.m. to 01 p.m.
परीक्षेची तारीख: २१ ऑगस्ट २०२१ (शनिवार)
वेळ: सकाळी ११ ते दुपारी १
12) Application dates:
26/07/2021 to 2/08/2021
आवेदन पत्र भरण्यासाठी कालावधी
२६/०७/२०२१ ते २/०८/२०२१
13)
Website for filling application:
अर्ज करण्यासाठी वेबसाईट:
http://cet.11thadmission.org.in/
14) Syllabus:
इ. ११ वी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इ. १० वीच्या
इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित
असेल.
२. सदर परीक्षेच्या १०० गुणांच्या एकाच प्रश्नपत्रिका/ पेपरमध्ये
उपरोक्त चार विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे १०० प्रश्न असतील, सदर गुण विभागणीचा तपशिल खालीलप्रमाणे,
इंग्रजी- 25 गुण
गणित (भाग १ व भाग २)- 25 गुण
विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग १ व भाग २)- 25 गुण
सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल)- 25 गुण
सदर ऑफलाईन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ
बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple
Choice Objective type Questions) असेल.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विषयनिहाय
२५% अभ्यासक्रम / घटक उपघटक वगळण्यात आलेले आहेत. सदर परीक्षेच्या
प्रश्नपत्रिकेमध्ये सदर वगळलेल्या भागांवर आधारीत प्रश्न समाविष्ट नसतील.
परीक्षा अर्ज भरण्याची पद्धत:
राज्यमंडळामार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
(इ.१०वी) परीक्षा उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी:-
१. विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक व
आईचे नाव याबाबतची इत्यादी माहिती भरावी. सदर माहिती सादर (Submit) केल्यानंतर उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप
भरली जाईल. विद्यार्थ्याने दिलेल्या रकान्यात त्याचा ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास)
भरावा.
२. विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प
देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम
त्याने सदर रकान्यात निश्चित करावे.
३. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी
इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक
शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल)
या विषयासाठी विद्यार्थ्यास इ. १० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७
माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.
४. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या
निवास स्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका /
शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी
विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी/शहरी
विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र
विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.
६. उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. तद्नंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.
७. उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची
आवश्यकता नाही.
अन्य मंडळांमार्फत तसेच
राज्यमंडळामार्फत (सन २०२१ पूर्वी) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी)
परीक्षा उत्तीर्ण /प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
१. विद्यार्थ्याने संगणक प्रणालीमध्ये दिलेल्या सर्व रकान्यातील
माहिती अचूक भरावी.
२. विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प
देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे
माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे.
विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी
इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक
शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल)
या विषयासाठी विद्यार्थ्यास इ. १० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७
माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.
३. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवास स्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी / शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.
४.सदर विद्यार्थ्यांबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी ओळख पडताळणीसाठी
फोटो आयडी (शाळेचे ओळखपत्र,
आधार कार्ड, इ.) पासपोर्ट साईझ फोटो व स्वाक्षरी नमूना
संगणक प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य राहील.
५. दिव्यांग विद्यार्थ्यांनी आवेदनत्रात दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून
निश्चित करावा तसेच त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे संगणक प्रणालीवर अपलोड करावीत.
६. उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर
(Submit) करावे. तद्नंतर विद्यार्थ्याने
आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.
७. उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी मंडळाने विहित केलेले
शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल.
परीक्षा शुल्क
इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१ साठी प्रविष्ट
होणाऱ्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना (सन २०२१ च्या नियमित परीक्षेला नोंदणी
केलेल्या) परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
मात्र सन २०२१ पूर्वी राज्यमंडळातून इ. १० वीची परीक्षा
उत्तीर्ण/प्रविष्ट झालेले विद्यार्थी, C.B.S.E.,C.I.S.C.E., सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना
सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाने विहित केल्याप्रमाणे प्रत्येकी रु.१७८/- शुल्क
उपलब्ध करुन दिलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक राहील. त्यासाठी Debit/Credit card/UPI/ Net Banking व तत्सम पर्याय उपलब्ध करुन दिले जातील, त्यापैकी एका पर्यांयाद्वारे शुल्क भरावे.
परीक्षा केंद्र
१. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र निश्चित करताना
त्याने आवेदनपत्रामध्ये नमूद केलेला जिल्हा व तालुका / शहरी भाग विचारात घेण्यात
येईल.
२. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या
तालुक्यामधून सदर परीक्षेसाठी प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन
त्या तालुक्यासाठी मंडळामार्फत परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील. त्यापैकी एक
केंद्र विद्यार्थ्याला देण्यात येईल.
ई. प्रवेशपत्र -
विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मंडळामार्फत ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन
दिले जाईल. सदर प्रवेशपत्र विद्यार्थ्यांने डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून
घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना विचारात घेऊन विद्यार्थ्याने परीक्षेस
प्रविष्ट व्हावे.
परीक्षेचे आयोजन व कार्यवाही
१. परीक्षेचे आयोजन मंडळाने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांवर करण्यात येईल.
२. सदर परीक्षा शनिवार दि. २१/०८/२०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी
१.०० या कालावधीत घेण्यात येईल.
३. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांने परीक्षा केंद्रावर किमान एक तास
अगोदर उपस्थित रहावे. तसेच कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर
शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करावे.
४. परीक्षा केंद्रावर व परीक्षे दरम्यान सर्व सूचनांचे काटेकोर पालन
करावे. कोणताही गैरमार्ग प्रकार निदर्शनास आल्यास विद्यार्थी निर्धारित शास्तीस
पात्र राहील.
महत्वाचे:
दि.
२०.०७.२०२१ ते दि. २१.०७.२०२१ या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया
पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना
आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक (Application No.) व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त
संकेतस्थळावर पाहता येईल. सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी
पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
28 Comments
११वीला सामाजिक शास्त्र हा विषय घ्यायचाच नाहीये तर त्याचे मूल्यमापन कशासाठी ???
ज्यांनी दहावीला सामाजिक शास्त्र हा विषय घेतलेला नाहीए व पुढेही घ्यायचा नाहीए त्यांच्यावर अन्याय नाही का होणार ???
What to do ?
२०/०७/२०२१ ते २६/०७/२०२१ दिली आहे आम्ही दिनांक २० जुलै पासुन रोज रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न दिवसातुन कित्येक वेळा करत आहे तरी सदर लिंक खुलत नाही व तांत्रिक अडचीनी मुळे .......बेबसाईड बंद आहे असे दर्शवते तरी मुदत २६ तारिख ला संपते तरी याबाबत विद्यार्थाना मार्गदर्शन करावे व मुदत वाढवुन द्यावी
आम्ही कोल्हापुर जिल्हातील आहे येथे महापुरा मुळे लाईट पाणी बंद आहे व नेटवर्क पण बरोबर काम करत नाही आहे तरी मुदत वाढविलेचे लवकर घोषणा करून विद्यार्थाचा व पालकांचा मनस्ताप थांबवावा ही नम्र विनंती