HSC Result and SSC Result
HSC Result and SSC Result- July 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व
कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी ) पुरवणी
लेखी परीक्षा दिनांक 16 जुलै, 2024 ते दिनांक 30 जुलै, 2024 व
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची पुरवणी लेखी परीक्षा दिनांक 16 जुलै, 2024 ते
8 ऑगस्ट, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात
आली होती.
तथापि परीक्षा कालावधीत दिनांक 26/07/2024 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. त्यानुसार शासनाने शाळांना सदर दिवशी सुट्टी जाहीर केलेली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात दिनांक 26/07/2024 रोजी असलेल्या इयत्ता १२ वी च्या विषयाची परीक्षा दिनांक 09/08/2024 रोजी व इयत्ता १० वीच्या विषयाची परीक्षा दिनांक 31/07/2024 रोजी घेण्यात आली.
-------------------------------------------------------
दहावी व बारावी गुणपत्रक मिळणेबाबत-
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च
माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना सोमवार दिनांक
०२/०९/२०२४ रोजी माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात दुपारी ३.०० वाजता
मिळणार
आहेत.
-------------------------------------------------------
सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून
निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील
पुढीलप्रमाणे आहे.
१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल
Click for Std. 10
👇
--------------------------------------
Click for Std. 12
👇
या
संकेतस्थळावर सोमवार, दिनांक 23/08/2024 रोजी दुपारी 01 वाजता जाहीर
करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व
सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
२) ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन
इ.१० वी साठी
---------------------------------------------------
इ.१२ वी साठी
स्वतः किंवा शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक 24/08/2024 ते गुरुवार, दिनांक 02/09/2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.
३) जुलै-ऑगस्ट 2024 पुरवणी परीक्षेच्या
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या
अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत
मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत
पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरून
संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक
राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी
अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
४) फेब्रुवारी-मार्च 2025 मधील माध्यमिक शालान्त
प्रमाणपत्र ( इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) परीक्षेस ज्या
विद्याथ्र्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा नियमित, पुनर्परिक्षार्थी
विद्यार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच
श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व ITI (औद्योगिक
प्रशिक्षण संस्था) द्वारे Transfer of Credit घेणान्या
विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा
मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
५ ) फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये प्रथम नोंदणी करून
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी
श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत
परीक्षेस पुनः प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली
असून सदर विद्यार्थ्याना श्रेणीसुधारसाठी फेब्रुवारी- मार्च
2025 परीक्षा ही अंतिम संधी असेल याची नोंद घ्यावी. त्यामुळे त्यापूर्वीचे असे
उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार
योजनेतंर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही.
६) जुलै-ऑगस्ट 2024 च्या
परीक्षेमध्ये सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement
Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी
तरतुदींच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतील.
-------------------------------
See more resources-
1) Common mistakes in English writing
10) Std. XI - English Activity Workbook
0 Comments